टाटांची नॅनो बंद होणार?

nanoटाटा मोटर्स 'टाटा नॅनो'ची भारतीय बाजारपेठेतील विक्री हळुहळु बंद करण्याचा विचार करीत आहे. या मोटारीला ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून मोटारीच्या पुनरुज्जीवनासाठी कंपनी आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, बाहेरील देशांमध्ये मोटारीची निर्यात सुरु ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे.

टाटा नॅनोला येत्या 2019 पासून क्रॅश टेस्ट पास करणे बंधनकारक आहे. याशिवाय, एप्रिल 2020 पासून बीएस-VI नियमांप्रमाणे मोटारीचे इंजिन तयार करावे लागेल. यासाठी, नव्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र, ग्राहकांचा प्रतिसाद पाहता कंपनी याबाबत निरुत्साही आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कंपनीसाठी हॅचबॅक विभागातील मोटारी महत्त्वाच्या आहेत. परंतु, सरकारी अटी आणि ग्राहकांच्या प्रतिसादावर या विभागाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, परदेशी बाजारपेठांमध्ये मोटारीचे उत्पादन सुरु राहील, असे टाटा मोटर्सच्या एका प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

नव्या नियमांमुळे मोटारींच्या किंमती सुमारे एक लाख रुपयांनी महागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, ग्राहकांचा मोटारीकडे असणारा कल कमी होऊ शकतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नॅनोच्या उत्पादनात 66 टक्क्यांची घट झाली आहे. या काळात कंपनीने अवघ्या 785 मोटारी तयार केल्या. गेल्यावर्षी याच काळात हे प्रमाण 2,352 एवढे होते. दरम्यान, मे महिन्यात कंपनीच्या विक्रीत तब्बल 55 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division