‘ओएनजीसी’ला सापडली तेलविहीर

ongcतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाला अर्थात ‘ओएनजीसी’ला वो-२४-३ या विहिरीत खनिज तेलाचा मोठा साठा सापडल्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘बॉम्बे हाय’ हे भारतातील सर्वांत मोठे खनिज तेल उत्खनन केंद्र आहे.‘ओएनजीसी’ला मिळालेल्या या विहिरीत दोन कोटी टन इतका तेलसाठा मिळण्याची आशा आहे. ‘बॉम्बे हाय’मध्ये सध्या दररोज २ लाख ५ हजार बॅरल तेलाचे उत्पादन घेतले जाते. येत्या दोन वर्षांत या विहिरीतून खनिज तेलाच्या नियमित उत्पादनाला सुरवात होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division