निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल अॅप

government unveils mobile app for pensionersसरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावर पेन्शन, ग्रॅच्युइटी, पीएफ यांचा मागोवा घेणे हे संबंधित कर्मचाऱ्याला, केवळ सरकार ही व्यवस्था पाठीशी नसल्यामुळे जिकिरीचे होते. यातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या निवृत्त होऊ घातलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवे मोबाइल अॅप आणले आहे.

या मोबाइल अॅपमुळे पेन्शनसंदर्भातील प्रकरणांचा छडा लावणे, पेन्शनचा मागोवा घेणे, शिल्लक तपासणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य होईल. त्याचप्रमाणे पेन्शनविषयक तक्रारींची नोंदही या अॅपवर करता येईल. ही माहिती पर्सोनेल व पेन्शन मंत्रालयाने सांगितले आहे. याखेरीज, या मंत्रालयाने पूर्वीच पेन्शनरांसाठी इंटरनेट पोर्टल सुरू केले आहे. मोबाइल अॅपवर पेन्शनरांसाठी असलेल्या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याच सेवा पेन्शन व पेन्शनर कल्याण विभागाने पोर्टलवर देऊ केल्या आहेत.

अॅपचा फायदा असा होईल...

- पेन्शन नेमके कधी मिळणार याचा मागोवा गेणे
- पेन्शनची निर्धारित रक्कम पाहणे
- पेन्शन कॅल्क्युलेटरच्या साह्याने पेन्शन मोजणे
- तक्रारी नोंदवणे
- पेन्शन विभागाचे जारी झालेले आदेश पाहणे

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division