‘उन्नती’ क्रेडिट कार्ड सुरू

sbi unnati credit card.jpg.image.975.568स्टेट बँकेने उन्नती क्रेडिट कार्डची सुरुवात केली आहे. या क्रेडिट कार्डच्या वापराला प्राधान्य देण्यासाठी बँकेतर्फे पहिली चार वर्षे त्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अन्य क्रेडिट कार्डप्रमाणे यावरही रिवॉर्ड पॉइंट देण्यात येणार आहेत.

कार्डच्या वापरावर प्रति शंभर रुपयांना एक रिवॉर्ड पॉइंट देण्यात येणार आहे. हे पॉइंट रिडीम केल्यानंतर संबंधित ग्राहकाला भेटवस्तू मिळविण्याची संधी मिळणार आहे. वर्षभरात क्रेडिट कार्डवरून पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिकची खरेदी केल्यास पाचशे रुपये कॅशबॅक मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत पंचवीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची मुदत ठेव ठेवली आहे, त्यांनाच हे कार्ड प्राप्त होणार आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division