‘मैत्रेय’च्या चार मालमत्ता विक्रीला

59655313भांडवल बाजार नियंत्रक सेबीने मैत्रेय सर्व्हिसेसच्या चार मालमत्ता विक्रीसाठी घोषित केल्या आहेत. या मालमत्तांची एकूण राखीव किंमत २२.८३ कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. कंपनीने बेकायदा पद्धतीने गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे त्यांना परत करण्यासाठी या मालमत्ता विक्रीला काढत असल्याचे सेबीने सांगितले आहे.

यापूर्वी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सेबीनेमैत्रेय सर्व्हिसेसच्या सहा मालमत्ता (मुख्यतः जमिनी) विक्रीला काढल्या होत्या. आत्ता विक्रीसाठी काढलेल्या मालमत्तांपैकी बव्हंशी मालमत्ता जमीन स्वरूपातीलच आहेत. या मालमत्ता गुजरात व महाराष्ट्र या राज्यांतून विभागलेल्या आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division