बँक खात्याशी 'आधार' क्रमांक जोडणे अनिवार्य

Link your aadhaar card with your Bank accountमाहिती अधिकाराअंतर्गत दाखल एका अर्जास उत्तर देताना आरबीआयने बॅंक खात्यासोबत आधार क्रमांक जोडणे अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज बॅंकेकडून पत्रक काढून याबाबतचा खुलासा करण्यात आला. आपला आधार क्रमांक बॅंक खात्याशी जोडणे अनिवार्य असून, "प्रिवेंशन ऑफ मनी लॉंड्रिंग ऍक्ट मधील दुसरी दुरुस्ती नियम-2017' नुसार ते सक्तीचे असल्याचे आरबीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

जून 2017 मध्ये जारी करण्यात आलेले नियम वैधानिकदृष्ट्या मान्य करावे लागतील, तसेच बॅंकांनी पुढील आदेशाची वाट न पाहता त्याची अंमलबजावणी करावी, असेही या पत्रकात नमूद आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच आधार क्रमांक बॅंकेशी जोडणे अनिवार्य केले असून, त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division