महाराष्ट्रात 'आयडिया' प्रथमस्थानी!

Ideaदूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 32.1 टक्के बाजारहिश्याय सह "आयडिया सेल्युलर' कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. सध्या "आयडिया'कडे महाराष्ट्र आणि गोवा मिळून सर्वाधिक म्हणजेच 71 लाख डेटा वापरकर्ते आहेत.

"आयडिया सेल्युलर'ने महाराष्ट्र आणि गोव्यात 4 जी नेटवर्कचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नव्या ग्राहकांबरोबर जुन्या ग्राहकांनादेखील आता अधिक वेगवान नेटवर्कचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 4 जी सेवेचा विस्तार अधिक वाढविण्यासाठी आधीपासून एफडी एलटीई तंत्रज्ञानाचा 1800 मेगाहर्टझ बॅंड्‌सचा वापर केला जात असून, आता बॅंडविड्‌थ 5 वरून 10 केल्याने ग्राहकांना ऑनलाइन सेवांचा आनंद घेण्यासाठी अधिक चांगले नेटवर्क उपलब्ध होणार आहे.

"आयडिया सेल्युलर'चे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी म्हणाले, की निमशहरी आणि ग्रामीण भागात झपाट्याने होत असलेला बाजारपेठांचा विस्तार आणि अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध होत असलेल्या मोबाईल सेवा यामुळे मोबाईल ग्राहकांचा आकडा सातत्याने वाढता राहिला आहे. शिवाय आम्ही उच्च दर्जाच्या डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्रात त्यासाठी एकूण 19,300 कोटी रुपयांची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. फक्त आकडेवारीच्या आघाडीवर प्रथम क्रमांकावर न राहता अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यावर आम्ही कायमच भर दिला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division