जीएसटीआर भरण्यासाठी मुदतवाढ

gst new 2017084780जुलै महिन्यासाठी भरायच्या ‘जीएसटीआर-२’साठीची मुदत केंद्र सरकारने एक महिन्याने वाढवून ३० नोव्हेंबर केली आहे. तर, ‘जीएसटीआर-३’ भरण्यासाठीची मुदत वाढवून ११ डिसेंबर केली आहे.

‘जीएसटीआर-२’ अथवा खरेदी रिटर्नची जुळवाजुळणी ‘जीएसटीआर-१’शी करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात ‘जीएसटीआर-२’ भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर होती. तर, ‘जीएसटीआर-३’ भरण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर होती. ‘जीएसटीआर-१’ आणि ‘जीएसटीआर-२’ची एकत्रित गोळाबेरीज म्हणून ‘जीएसटीआर-३’ आहे. जुलै महिन्याचे ‘जीएसटीआर-१’ भरण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर निर्धारित करण्यात आली होती. आतापर्यंत ४५.६४ लाख कंपन्यांनी ‘जीएसटीआर-१’ दाखल केले आहेत. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मुदतीत वाढ केल्याने ३०.८१ लाख करदात्यांना जुलै महिन्याचे ‘जीएसटीआर-२’ जमा करण्यासाठी आणखी कालावधी मिळणार आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division