मोबाइल शॉपिंग अॅपची वाढती मोहिनी

mobile shopping how to create a perfect customer experienceनुकत्याच झालेल्या दिवाळीत बाजारपेठा ओस पडलेल्या दिसल्या. मात्र भारतीयांनी मोबाइलच्या साह्याने ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य दिल्यामुळे प्रत्यक्ष दुकानांत ग्राहक फारसा दिसला नाही. ६० टक्क्यांहून अधिक भारतीयांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिल्याचे ऑनलाइन मार्केटिंग कंपनी क्रिटिओचे म्हणणे आहे.

प्रत्येक महिन्यात या ६० टक्के लोकांनी किमान २ ते ५ वेळा ऑनलाइन खरेदी केल्याचे यासंदर्भात कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणासाठी विविध वयोगटातील व्यक्तींना प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी ७४ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आपण दोनपेक्षा अधिक शॉपिंग अॅप डाउनलोड केल्याचे सांगितले. ऑनलाइन शॉपिंग करताना आपल्याला सुरक्षित वाटते अशी प्रतिक्रिया ८० टक्के लोकांनी दिली आहे. मोबाइलचा वापर करून महागड्या वस्तूंची खरेदीही यंदा मोठ्या प्रमाणावर झाली.

मोबाइलवरील शॉपिंग अॅपवर सतत विविध उत्पादनांच्या जाहिराती दिसतात. मागील तीन महिन्यांचा आढावा घेतल्यास ३४ टक्के भारतीयांनी या जाहिराती पाहिल्या आहेत. त्याचप्रमाणे या जाहिरातींच्या अनुषंगाने या ग्राहकांनी खरेदीही केली आहे. यामध्ये खाद्यपदार्थांची मागणी नोंदवणे, किराणा माल खरेदी करणे, टॅक्सी बुक करणे यांचे प्रमाणा सर्वाधिक आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division