बिटकॉइन एक्स्चें जवर देशभरात छापे

bit coinsदेशभरातील प्रमुख बिटकॉइन एक्स्चें जवर करचुकवेगिरीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने अलीकडेच छापे घातले. प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर तपास शाखेच्या अंतर्गत असलेल्या पथकांनी देशभरात नऊ बिटकॉइन एक्स्चें्जवर छापे घातले. यामध्ये दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोची आणि गुडगाव येथील एक्स्चें जचा समावेश आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ‘१३३ अ’ नुसार गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी आणि व्यवहारांची तपासणी करण्यासाठी तसेच, या व्यवहारांशी निगडित बॅंक खात्यांची तपासणी करण्यासाठी हे छापे घालण्यात आले. छापा घालणाऱ्या पथकांकडे या एक्स्चेंयजमधील आर्थिक व्यवहारांची माहिती होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. बिटकॉइन एक्स्चें जवरील ही आतापर्यंत देशातील सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. बिटकॉइन ही व्हर्च्युअल करन्सी असून, भारतात त्यावर अद्याप सरकारी नियंत्रण नाही.