नव्या वर्षांत देशातले वीजदर वाढतील - ऊर्जामंत्रालयाचे संकेत

electricityनव्या वर्षात देशभरात विजेचे दर प्रति किलोवॉट ६२ ते ९३ पैशांनी अर्थात २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी नुकतेच लोकसभेत बोलताना दिले आहेत. कोळशापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही सिंह यांनी यावेळी नमूद केले. देशात तयार होणाऱ्या एकूण वीजनिर्मितीपैकी तीन चतुर्थांश वीजनिर्मिती या तीन ते चार प्रकल्पांतच होते. सध्या विजेचा दर प्रति किलोवॉटसाठी पाच रुपयांच्या आसपास आहे.

गेल्या वर्षी प्रदूषण वाढल्याचा फटका दिल्लीसमवेत अन्य मोठ्या शहरांना बसला होता. या शहरांमध्ये धुरके निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली होती. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोळशापासून वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर आपले प्रकल्प अपडेट करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे. कंपन्यांना अपडेट करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज करण्यासाठी विजेच्या दरांत २० टक्के वाढ करणार आहे.