आभासी चलनाला कोणतेही संरक्षण नाही;
गुंतवणूकदारांनी सावध रहावं - केंद्रसरकारचा इशारा

Bit Coinsबिटकॉइनसह अन्य आभासी चलनांचे आकर्षण वाढत असून याची गंभीर दखल सरकारनेही घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आभासी चलनाची तुलना फसव्या (पॉन्झी) योजनांशी केली आहे. आभासी चलन हे पॉन्झी योजनेसमान असल्याने गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावध असावे, असा सल्ला या मंत्रालयाने दिला आहे.

आभासी चलनाला कोणतेही संरक्षण नाही तसेच ते वैध चलन समजण्यात येत नाही. यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात नमूद केले आहे की, ‘आभासी चलनाच्या लाटेवर स्वार होऊन यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीचा फुगवटा निर्माण होऊन तो केव्हाही फुटू शकतो. पॉन्झी योजनांमध्येही वचन दिलेल्या लाभांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली जाते. यामध्ये रिटेल गुंतवणूकदार फसले जातात. म्हणूनच आभासी चलनामध्ये गुंतवणूक करताना त्याला पॉन्झी योजनेसमान समजून अत्यंत सावधगिरीने गुंतवणूक करावी आणि या चलनापासून मिळणाऱ्या लाभांना बळी पडू नये.’