सरकारचा महसूल बुडवणाऱ्या पाच कंपन्यांना दूरसंचार
विभाग नोटीस बजावणार

telecomदूरसंचार विभाग पाच दूरसंचार कंपन्यांना नोटिसा पाठवणार आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस, टेलिनॉर, रिलायन्स जिओ, व्हिडिओकॉन टेलिकॉम व क्वाड्रन्ट या पाच कंपन्यांनी सरकारचे एकूण २,५७८ कोटी रुपये थकवले आहेत. यासाठीही ही नोटीस पाठवली जाणार आहे. महालेखापालांनी दिलेल्या एका अहवालानुसार या पाच कंपन्यांनी आपला महसूल १४,८०० कोटी रुपयांनी कमी दाखवला होता. यामुळे सरकारी तिजोरीत २,५७८ कोटी रुपये कमी भर पडली होती.