भूषण स्टील खरेदीसाठी स्पर्धक उत्सुक

bhushan steelकर्जाचा मोठा भार असलेली भूषण स्टील ही पोलाद कंपनी खरेदी करण्याच्या स्पर्धेत आता टाटा समूहातील टाटा स्टीलही उतरली आहे. कंपनीचा कर्मचारी गटही या प्रक्रियेत सहभागी झाला आहे. भूषण स्टील खरेदीच्या निविदा प्रक्रियेत जेएसडब्ल्यू लिव्हिंग व पिरामल एंटरप्राईजेस यांची भागीदारीतील कंपनीही सहभागी झाली आहे. कंपनीकरिता विविध उद्योग समूहांनी रस दाखविल्याची माहिती भूषण स्टीलने मुंबई शेअर बाजाराला दिली.

थकित कर्जासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या प्रक्रियेकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या पहिल्या यादीतील १२ खात्यांमध्ये भूषण स्टीलच्या कर्जखात्याचा समावेश आहे. कंपनीकडून विविध बँकांचे ४४,४७८ कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे.