जगभरातील मध्यवर्ती बँकांची धोरणे मंदीला कारणीभूत

WorldsCentralBanker070214जगभरात मध्यवर्ती बॅंकांची सध्याची अयोग्य धोरणेच अर्थव्यवस्थेला १९३० सारख्या मंदीच्या स्थितीकडे नेतील, अशी भीती रिझव्र्ह बॅंकेने व्यक्त केली आहे. लंडन येथे बिजनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी १९३० च्या जागतिक आर्थिक महामंदीचा उल्लेख केला. युरो झोनमधील अस्थिरता हे एक संकट आहे. मात्र तेही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जग महामंदीत जाईल, असा अर्थ काढणे चूक आहे. जगाच्या तुलनेत भारताची स्थिती वेगळी आहे. रिझव्र्ह बॅंकेचे त्याकडे बारीक लक्ष असून, गुंतवणुकीला चालना देण्यासाठीच दरकपातीसारखी पावले उचलली जात आहेत, असेही मत बॅंकेने व्यक्त केले आहे.  जागतिक बँकांनी नव्या नियमांची चौकट आखली पाहिजे आणि त्यासाठी पूरक स्थितीही तयार होत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यपद्धतीत समन्वयाची आवश्यकता आहे. नव्या नियमांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडण्यापेक्षा त्यासाठी अधिक संशोधन आणि कृती होणे आवश्यक आहे असेही रिझव्र्ह बॅंकेने म्हटले आहे.
आयातीवरील स्वत:चे अवलंबित्व कमी करताना अनेक देश निर्यात मागणी वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत; परिणामी निर्यात स्वस्त करण्यासाठी या देशांनी स्थानिक चलनाचे अवमूल्यन करून घेतले आहे, असे विविध देशांच्या भूमिकेबाबतचे स्पष्टीकरण रिझव्र्ह बँकेने दिले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division