देशात नोटाबंदीच्या आधीएवढेच चलन पुन्हा वितरणात

Notebandiमुंबई : नोटाबंदीनंतर वितरणातील चलन कमी झाल्याने डिजिटल व्यवहार काही काळ वाढले होते. परंतु, आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, नोटाबंदीआधी वितरणात असलेल्या चलनाएवढेच चलन वितरणात आले आहे. जनतेकडून रोख व्यवहारांनाच प्राधान्य मिळत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. वितरणातील चलन यावर्षी17.78 लाख कोटी रुपये होते. नोटाबंदी होण्यापूर्वी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी वितरणातील चलन 17.97 लाख कोटी रुपये होते. नोटाबंदीनंतर यातील 14.48 लाख कोटी बॅंकिंग यंत्रणेत परत आले. म्हणजेच यावर्षी16 फेब्रुवारीपर्यंत99.94 टक्के चलन पुन्हा वितरणात आले आहे. वितरणातील चलन 16 जून 2017 रोजी 15.29 लाख कोटी रुपये होते. नोटाबंदीआधी वितरणात असलेल्या चलनाच्या तुलनेत हे चलन 86.2 टक्के होते.कमीमूल्याच्यानोटाअधिकरिझर्व्ह बॅंकेने 9 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत 23.8 अब्ज नोटा वितरणात आणल्या. त्यांचे एकूण मूल्य 5 हजार 540 अब्ज रुपये होते. रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत वितरीत केलेल्या चलनामध्ये कमी मूल्याच्या नोटा (दोनशे, शंभर आणि त्यापेक्षा कमी ) निम्म्यापेक्षा अधिक होत्या. सरकारने डिजिटायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी कमी मूल्याचा नोटा वितरणात वाढवल्या होत्या.