महाबँक' आता देणार व्यवसायवाढीवर लक्ष

2BoM h 0''थकीत कर्जांच्या वसुलीचे आमच्या प्रयत्नांना बरेच यश येत असून, यापुढच्या काळात हे प्रयत्न प्राधान्याने सुरूच ठेवले जातील. आणखी 'स्लीपेजेस' होऊ न देण्यासाठी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सर्व करत असताना व्यवसायवाढीवरही लक्ष दिले जाणार आहे,'' असे बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांनी येथे सांगितले.31 डिसेंबर 2017 रोजी संपलेल्या नऊमाहीमध्ये डिसेंबर 2016 रोजी संपलेल्या नऊमाहीच्या तुलनेत बँकेच्या कार्यान्वयन नफ्यात 17.39टक्यां न ची वाढ झाली आहे. सामूहिक आणि एकत्रित प्रयत्नांमुळे 31 डिसेंबर 2016 च्या तुलनेत 31 डिसेंबर 2017 ला संपलेल्या नऊमाहीमध्ये थकीत कर्जांच्या वसुलीमध्ये177.78 टक्के वाढ झाली आहे.
बँकेच्या व्यवसायवृद्धीमधील संधीबाबत ते म्हणाले, की सरकारकडून मोठ्या प्रमाणात भांडवलसहकार्य मिळाल्याने आमच्याकडे पुरेसे भांडवल आले आहे, येत आहे; ज्यायोगे लघुउद्योग, कृषी आणि किरकोळ कर्जे यासारख्या व्यवसायवाढीच्या घटकांवर बँक लक्ष केंद्रित करू शकेल. किरकोळ कर्जांचा विभाग बळकट करण्यावर विशेष भर असेल. कॉर्पोरेट कर्जावर कमी लक्ष दिले जाईल. तसेच व्याजेतर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.बँकेनेक्षेत्रीय कार्यालय आणि शाखांच्या सुसूत्रीकरणाद्वारे खर्चात कपात आणि नफ्यात वाढ करण्यासाठी योजना आखून त्या लागू केल्या आहेत. बँकेने या वर्षी 34 शाखा आणि तीन क्षेत्रीय कार्यालयांचे एकत्रीकरण केले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division