श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम

1india 11जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारताची एकूण संपत्ती 2017 अखेर 8 हजार 230 अब्ज डॉलर असून, या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे."न्यू वर्ल्ड वेल्थ'ने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे.
"न्यू वर्ल्ड वेल्थ'च्या अहवालानुसार, अमेरिका हा जगातील सर्वांत श्रीमंत देश ठरला आहे. अमेरिकेची एकूण संपत्ती 2017 मध्ये 64 हजार 584 अब्ज डॉलर होती. चीन दुसऱ्या क्रमांकावर असून, चीनची संपत्ती 24 हजार 803 अब्ज डॉलर आहे. जपान तिसऱ्या क्रमांकावर असून, संपत्ती 19 हजार 522 अब्ज डॉलर आहे. देशांच्या एकूण संपत्ती म्हणजे देशातील व्यक्तींची खासगी संपत्ती गृहित धरण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता, रोकड, रोखे, व्यवसाय यांचा समावेश आहे. या अहवालात सरकारी निधीचा समावेश करण्यात आलेला नाही. यादीत ब्रिटन चौथ्या क्रमांकावर असून, संपत्ती 9 हजार 919 अब्ज डॉलर आहे. जर्मनी पाचव्या क्रमांकावर असून, संपत्ती 9 हजार 660 अब्ज डॉलर आहे.जागतिक पातळीवर भारत अतिशय चांगली बाजारपेठ ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताची संपत्ती 2016 मध्ये 6 हजार 584 अब्ज डॉलर होती. ती 2017 मध्ये 25टक्यांी नी वाढून 8 हजार 230 अब्ज डॉलरवर पोचली. दरम्यान, याच कालावधीत चीनची संपत्ती 22टक्यां्त नी आणि जागतिक संपत्ती 12टक्यां4ा नी वाढली आहे. जागतिक संपत्ती 2016 अखेर 192ट्रिलियन डॉलर होती. ती 2017 अखेरीस 125ट्रिलियनडॉलरवर पोचली. भारताची संपत्ती 2007 ते 2017 या दशकात 3 हजार 165 अब्ज डॉलरवरून 160टक्यां प नी वाढून 8 हजार 230 अब्ज डॉलरवर पोचली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division