स्टेट बँकेवर २०,००० कोटींच्या अतिरिक्त तोटय़ाची टांगती तलवार

SBIअवाजवीरोखेधारणेतून नवीन संकटनीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा विस्तारत असलेला फास आणि बुडीत कर्जासाठी वाढीव तरतुदीने पुरत्या वाकलेल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या कर्ज रोख्यांतील धारणेने होणाऱ्यातोटय़ाच्या अतिरिक्त भाराचा आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत सामना करावा लागणार आहे. बँकिंग अग्रणी एकटय़ा स्टेट बँकेला जानेवारी ते मार्च तिमाहीत यापोटी २०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त तोटा सोसावा लागेल, असा ‘क्रेडिट सुईस’ या दलाली संस्थेने हा कयास व्यक्त केला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिलेल्या बंधनापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या काही काळात कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. तथापि अलीकडच्या काळात रोख्यांच्या किमतीतील घसरण ही धारणेसंबंधाने मोठी अडचण ठरली असून, बँकांना परताव्यातील ही तूट भरून काढण्यासाठी त्यांच्या नफ्यातून अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. यामुळे तब्बल पाच लाख कोटी रुपये मूल्याचे रोखे धारण करीत असलेल्या स्टेट बँकेला जानेवारी ते मार्च तिमाहीत २०,००० कोटींचा तोटा केवळ या कारणाने सोसावा लागेल, असे गंभीर निरीक्षण क्रेडिट सुईस या अहवालातून नोंदविले आहे.
तब्बल दोन लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाचा भार असलेल्या स्टेट बँकेला यापोटी आपल्या मिळकतीतून मोठी तरतूद करावी लागेल. शिवाय रोखे धारणेतील घसरलेल्या किमतीची तूट भरून काढण्यासाठी मोठी तरतूद करावी लागणे हे बँकेवरील अतिरिक्त भार ठरेल. १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या किमती या वाढत्या महागाईच्या संकेतासरशी सलग तिसऱ्या तिमाहीत घसरत चालल्या आहेत. तर स्टेट बँकेने गेल्या १२ वर्षांतील उच्चांकी धारणा रोख्यांमध्ये आहे, रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास १० टक्क्य़ांहून अधिक पातळीवर ही धारणा गेली आहे. आगामी तिमाहीतील हे संकट टाळण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून काही तरी उपाय पुढे आणले जातील, अशी आशाही क्रेडिट sसुईसने व्यक्त केली आहे.