तक्रार निवारण समितीच्या सदस्यपदी उदय तारदाळकरांची नियुक्ती

UDAY PICउदय तारदाळकर हे आपल्याला अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. भांडवली बाजार नियामक (सेबी) ने भारतातील सर्व एक्सचेंजेसना तक्रार निवारण समिती करण्यासाठी शिफारस केली आहे. गुंतवणुकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक्सचेंजचे समन्वयक म्हणून काम करताना परस्पर संवादाद्वारे विवादांचे निराकरण करणे हे ह्या समितीचे मुख्य काम असते. उदय तारदाळकर ह्यांची मल्टी कमोडिटी एक्सचेंज ह्या भारतातल्या सर्वात मोठ्या कमोडिटी एक्सचेंजच्या, गुंतवणूकदारांची तक्रार निवारण समितीचे सदस्य म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली. श्री तारदाळकर हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या समितीवर २०१३ पासून आणि नॅशनल कमोडिटी आणि डेरीवेटीव्ह एक्सचेंज ह्या एक्सचेंजच्या समितीवर २०१६पासून कार्यरत आहेत.