पर्यायी इंधन वापर धोरणामुळे राज्यात उद्योगांना मोठी संधी

12देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले असून यासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रीक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, असे मत ‘इमरजिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स’ या चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.बीकेसी येथे एम एम आर डी ए मैदानावरील मॅग्नेटीक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स हा परिसंवाद झाला. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगाचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका, कानपूर आय आय टीचे प्रा. सिध्दार्थ पांडा,टाटा पॉवर आणि सोलर सिस्टीम्सचे आशिष खन्ना, सीआयआयचे सुमित सिन्हा, हिंदुजा सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माहेश्वरी, एनडीटीव्हीच्या पर्यावरण रिपोर्टर गार्गी रावत यांनी सहभाग घेतला.डॉ. गोयंका म्हणाले, प्रदूषण रोखणे, पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे आदींसाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यासाठी पावले उचलताना राज्यांनी यासाठी नियमांमध्ये सुधारणा कराव्यात यासाठी आवश्यक उद्योग, वाहने आदी धोरण बनविण्याचे निर्देश दिले होते. सिन्हा यांनी नवीकरणीय ऊर्जा वापरामुळे बदलणारे तंत्राचे फायदे त्यातील मर्यादा नमूद केल्या. ते म्हणाले, इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरीच्या वापरामुळे या क्षेत्रातीलमागणी मोठ्या प्रमाणात आहे. याला शासनाचे धोरण पूरक ठरणार आहे. कपिल माहेश्वरीयांच्या मते सौर उर्जा उत्पादनासाठी भौगालिक क्षेत्राची गरज असून त्यासाठी रहिवासी क्षेत्रातील रुफटॉपसंकल्पना हामहत्वाचा मुद्दा ठरतोय व त्याचा आर्थिक परिणाम नागरीकांना लाभदायक ठरु शकतो. यासाठी सर्वस्तरापर्यंतजागृती व्हावी, असे त्यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division