एल अॅण्डटीच्या विद्युत व्यवसायाची श्नायडर इलेक्ट्रिकला विक्री

ltअभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अॅीण्ड टुब्रोने आपल्या विद्युत आणि स्वयंचालन व्यवसायाचे अंग पूर्णपणे १४,००० कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात श्नायडर इलेक्ट्रिक या जागतिक कंपनीकडे हस्तांतरणाचा करार केला असल्याचे जाहीर केले.एल अॅ्ण्डटीच्या गैर-मूलभूत व्यवसायातून अंग काढून घेण्याच्या व्यापक रणनीतीचा एक भाग म्हणून ई अॅमण्ड ए व्यवसायातून ही निर्गुतवणूक करण्यात आली आहे. लार्सन अॅण्ड टुब्रोकडून ई अॅसण्ड ए व्यवसायांतर्गत अल्प आणि मध्यम विद्युत भाराच्या स्विचगीयर्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्सची निर्मिती केली जात आहे. विक्री करण्यात आलेल्या या व्यवसायातून कंपनीने २०१७-१८ सालात ५,०३८ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. नवी मुंबई, अहमदनगर, बडोदे, कोईम्बतूर आणि म्हैसूर यासह विदेशात सौदी अरब, दुबई, कुवैत, मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रिटन येथे या व्यवसाय विभागाचे उत्पादन प्रकल्प आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division