‘प्लास्टिक बंदीने संशोधन उद्योगासाठी व्यवसाय संधीच’

plastic bagsसंशोधन क्षेत्रासाठी मोठी व्यवसाय संधी असल्याचे मानले जात आहे. राज्यातील प्लास्टिक बंदीमुळे पीईटी/प्लास्टिक्स उद्योगाला पर्यायी पॅकेजिंग उत्पादने आणि पुनर्वापरयोग्यप्लास्टिक उत्पादनांची निर्मिती अत्यावश्यक बनली आहे. अद्याप त्यांना असा पर्याय पुढे आणता आलेला नाही आणि हीच देशातील विश्लेषणात्मक साधने (अॅननालिटिकलइन्स्ट्रमेंट्स) आणि संशोधन क्षेत्रासाठी मोठी व्यवसाय संधी असल्याचे मानले जात आहे.
मुंबई आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि अन्य उत्पादनासंबंधी प्रकल्प असून, अनेकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. हजारोंच्या संख्येने उद्योग बंद पडून, लाखोंनाबेरोजगारीच्या संकटापासून वाचविण्यासाठीप्लास्टिक उद्योगाला नवा पर्याय शोधणे क्रमप्राप्त आहे, मुंबईत कार्यरत सुमारे चार हजार संशोधन प्रयोगशाळांमधून या जैव विघटनशीलप्लास्टिक्सच्या पर्यायावर काम सुरू आहे. गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात २५ आणि २६ एप्रिल रोजी आयोजित ‘इंडिया लॅब एक्स्पो’ या विश्लेषणात्मक साधने आणि प्रयोगशालेय उपकरणांच्या प्रदर्शनात अशाच उद्योगाचे प्रतिनिधित्व देशी-विदेशी ८० कंपन्या सहभागी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मेस्सेम्युनचेन इंडियाकडून गेली १० वर्षे हे प्रदर्शन हैदराबादमध्येयोजण्यात येते आणि यंदा ते प्रथमच मुंबईत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनानिमित्त खरेदीदार-विक्रेत्यांना एकत्र आणणाऱ्या ३०० बैठका योजण्यात आल्या असून, त्यातून ३०० कोटींची व्यावसायिक उलाढाल अपेक्षित आहे.