एअर इंडियाच्या निविदा प्रक्रियेस मुदतवाढ

resizemode 4MT imageखासगीकरणाचे वेध लागलेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी अद्याप एकही खासगी कंपनी पुढे न आल्याने केंद्र सरकारने या विषयीच्या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. या निर्गुतंवणुकीसाठी स्वारस्य दाखविण्याची मुदत (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) 31 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत 14 मेपर्यंत ठेवण्यात आली होती.
एअर इंडियावर सुमारे 49 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. या कंपनीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने तिचे निर्गुंतवणुकीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील 76 टक्के भांडवली हिस्सा विकण्यात येणार आहे. मात्र यासाठीच्या अटी जाचक असल्याचे सांगत इंडिगो, जेट एअरवेज व टाटा समूहाने या प्रक्रियेत स्वारस्य नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मुदतवाढ दिली आहे.
याशिवाय इच्छुक कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांवर अंतिम निर्णय देण्याची मुदतही सरकारने वाढवली आहे. खासगीकरणाचा ठेका मिळणार्याद कंपनीच्या नावाची घोषणा आता 15 जूनला करण्यात येईल. सुरुवातीला प्रक्रियेनुसारही घोषणा 28 मे रोजी होणार होती.