'भारत सर्वात जलद आर्थिक प्रगती करेल': जागतिक बँक

worldbankजगातील सर्वच देशांमध्ये आर्थिक मंदी पसरलेली आहे, तरीदेखील भारत जगभरातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली प्रगती करू शकतो, असे मत जागतिक बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या मते भारत ७.५ या अपेक्षित विकासदरासोबत चीनसारख्या मोठ्या देशालाही मागे टाकू शकतो. देशात नव्या आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढत आहे. त्यामुळे देश नव्या गुंतवणुकीला आकर्षित करत आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती खाली येत असल्याचादेखील भारताला फायदा होत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी अलिकडेच जागतिक आर्थिक अपेक्षांचा अहवाल सादर करताना ही माहिती दिली. त्यांच्या मते विकसनशील देशांच्या विकासाचा दर या वर्षी ४.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये तो ५.२ तर २०१७ मध्ये ५.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division