‘जीएसटी’ उत्पन्न ९४ हजार कोटींवर

resizemode 4MT imageवस्तू आणि सेवा करा’च्या (जीएसटी) माध्यमातून मे महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीत ९४,०१६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यातील ‘जीएसटी’चे उत्पन्न एप्रिलच्या तुलनेत घसरल्याचे दिसून आले आहे. दरमहा जीएसटी उत्पन्नाचा आढावा घेतला असता, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नव्या आर्थिक वर्षात उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा दरमहा सरासरी ८९,८८५ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न जीएसटीतून मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात बारा लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मे महिन्यात ‘जीएसटी’द्वारा ९४,०१६ कोटी रुपयांचा महसूल जीएसटीद्वारे प्राप्त झाले आहे. त्यामध्ये ‘सीजीएसटी’तून १५,८६६ कोटी रुपये, ‘सीजीएसटी’तून २१,६९१ कोटी रुपये, ‘आयजीएसटी’तून ४९,१२० कोटी रुपये (२४,४४७ कोटी रुपयांच्याआयातकराचाही समावेश आहे.) आणि उपकरांद्वारे प्राप्त झालेल्या ७,३३९ कोटी रुपयांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात ‘जीएसटी’द्वारा १,०३, ४५८ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यामुळे प्रथमच ‘जीएसटी’च्या उत्पन्नाने एक लाख कोटी रुपयांचा पल्ला ओलांडला होता. एक जुलै २०१७ पासून देशभर‘वस्तू आणि सेवा कर’ लागू झाला होता.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division