एलईडी लायटिंग उद्योगाचे भविष्य उज्ज्वल

led lightsएलईडी लायटिंग उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, सरकारच्या नव्या धोरणांमुळे अधिक चालना मिळत आहे. ऊर्जाबचतीबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होईल, या हेतूने सरकारने एलईडी एलईडीवर आधारित होम व स्ट्रीट लायटिंग उद्योगाला चालना दिली आहे.
२०१३ अखेर भारतातील एलईडीचा उद्योग रु. १९२५ कोटी एवढा होता, तर एकूण लायटिंग उद्योग रु.१३ हजार कोटी होता. २०२० पर्यंत भारतातील एकूण लायटिंग उद्योग रु. ३५ हजार कोटी असेल, तर एलईडी उद्योग तब्बल रु. २१,६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. याचाच अर्थ २०२० पर्यंत एकूण लायटिंग उद्योगापैकी ६० टक्के वाटा ‘एलईडी’चा असेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division