टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा वाद, सायरस मिस्त्रींची हाकालपट्टी

TATAटाटा समूहाच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच समूहाच्या बोर्ड मिटींगमध्ये सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. मिस्त्री यांनी कंपनीतील गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप ठेवत त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने सायरस मिस्त्री यांची याचिका फेटाळली आहे. टाटा समूहाच्या चेअरमन पदावरुन मिस्त्री यांना हटविण्यात आले होते. त्याविरोधात मिस्त्री यांनी एनसीएलटीकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना, बोर्डाला मिस्त्री यांच्यावर भरोसा नसल्याचे सांगत एनसीएलटीने ही याचिका फेटाळली आहे.
याप्रकरणी मिस्त्री यांनी एनसीएलटीकडे याचिका दाखल करुन न्याय मागितला होता. गेल्या 18 महिन्यांपासून टाटा आणि मिस्त्री यांच्यात हा वाद सुरू होता. मात्र, एनसीएलटीने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देत मिस्त्री यांना धक्का दिला. तसेच पदावरुन हटविण्याचे अधिकार बोर्डाला असल्याचे आपल्या आदेशात म्हटले. याव्यतिरिक्त रतन टाटा यांच्यावर लावण्यात आलेले आरोपही फेटाळले असून टाटा समूह व्यवस्थापनात कुठलीही गडबड नसल्याचे एनसीएलटीने आदेशात म्हटले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division