व्होडाफोनच्या ‘थ्री-जी’बरोबरच ‘डेटा’ला मोठी मागणी

vodafone 3g 01‘व्होडाफोन’च्या सध्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात पाच हजारांहून अधिक थ्री-जी साइट्स आहेत. ग्राहकांकडून थ्री-जीला वाढती मागणी असून, त्याची वर्षागणिक वाढ १०० टक्के आहे. परिमंडळातील सेवा महसुलात ‘डेटा’चा वाटा वाढत चालला असून, सध्या तो १८ टक्के आहे, अशी माहिती परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांनी दिली आहे. व्होडाफोन इंडियाने नेटवर्क विस्तार, वितरण आणि रिटेलमधील अस्तित्व वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात १०५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे सांगून चंद्रा म्हणाले, की व्होडाफोनने आपले लक्ष ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यावर; तसेच त्यांच्यासाठी उपयुक्त योजना राबविण्यावर केंद्रित केले आहे. एप्रिल २०१४ पासून १७ नवी व्होडाफोन स्टोअर्स आणि २०० व्होडाफोन मिनी स्टोअर्स सुरू करून रिटेलचाही विस्तार केला आहे. या विस्ताराद्वारे व्होडाफोनने महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील आपली आघाडी आणखी वाढविली आहे.
विविध योजनांव्यतिरिक्त कंपनीने ‘एम-पेसा’ ही मोबाइल बॅंकिंग आणि पेमेंट सोल्युशन सुविधा सुरू केली असून, त्याला शहरातील स्थलांतरित लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून चालविला जाणारा ‘व्होडाफोन एंजेल स्टोअर्स’ हाही एक वेगळा उपक्रम आहे. पुण्यातील कोथरूड आणि गोव्यातील मडगाव येथे अशी स्टोअर्स सुरू करण्यात आलेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division