राज्यात ‘मॅगी’ विक्रीवर बंदी

maggi ban 2मॅगीच्या नमुन्यांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात शिसे आढळल्याने, राज्यात मॅगीच्या विक्रीला बंदी घालण्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. देशभरात विविध ठिकाणी 'मॅगी’च्या नमुन्यांमध्ये मोनोसोडियम ग्लुटोमेट आणि तसेच शिसाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे केरळ, दिल्लीच्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे. बिहारच्या कोर्टानेदेखील त्या बाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात मॅगीच्या नमुन्यांच्या झालेल्या तपासणीनंतर राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे.
पुण्यातून मॅगीचे सहा नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी तीन नमुन्यांमध्ये शिसाचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणमापेक्षा अधिक असल्याचे तपासणीतून उघड झाले. मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण २.५ पीपीएमपेक्षा अधिक झाल्यास, ते मानवी आरोग्याला अपायकारक ठरू शकते. मात्र, या तीन नमुन्यांमध्ये शिसाचे हे प्रमाण अनुक्रमे २.५५ पीपीएम, २.५९ पीपीएम आणि ४.६६ पीपीएम असे आढळून आले. उर्वरीत तीन सॅम्पलमध्ये ते २.२४ पीपीएम, १.७२ पीपीएम आणि १.६२ पीपीएम इतके दिसले. सहा नमुन्यांपैकी तीन नमुने गोव्यातून, तर तीन उत्तराखंड येथून उत्पादित झाले होते. उत्तराखंडचे दोन आणि गोव्यातील एका नमुन्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिसे आढळून आले.
मॅगीच्या या तपासणीमधून मॅगीच्या लेबलवर दिलेली माहितीही खोटी असल्याचे आढळून आल्याचेही अन्न आणि प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. एकीकडे मॅगीच्या लेबलवर मोनोसोडिअम ग्लुटोमेट नाही असे नमूद केले असताना, प्रत्यक्षात हे रसायनही मॅगीमध्ये आढळून आले आहे.
‘फ्युचर ग्रुप’ने मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘फ्युचर ग्रुप’च्या अधिपत्याखाली असलेल्या देशभरातील बिग बाजार’, ‘निलगिरी सुपरमार्केट’ आणि ‘इजी-डे’ या सर्व रिटेल मॉल्समधून मॅगी बंद होणार आहे. 'मॅगी’च्या नमुन्यात हानिकारक पदार्थांचे प्रमाण आढळून आल्याने सुरू असलेला वाद आणि ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन मॅगीची विक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘फ्युचर ग्रुप’च्या वतीने सांगण्यात आले आहे. देशभरातील तब्बल २५९ शहरांमध्ये असलेल्या ‘बिग बाजार’च्या सर्व आऊटलेट्समधून मॅगीची विक्री बंद होणार आहे. ‘फ्युचर ग्रुप’सारख्या रिटेल क्षेत्रातील मोठ्या कंपनीने घेतलेला हा निर्णय मॅगीचे उत्पादन करणाऱ्या नेसले कंपनीसाठी मोठा धक्का ठरणार आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division