'निमा' व 'महावितरण' तर्फे वीज ग्राहक सुरक्षा या विषयावर परिसंवाद

nimaदि. २४ जून  रोजी 'निमा', सिन्नर आणि 'महावितरण' यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक सुरक्षा या विषयावर परिसंवादाचे आयोजन निमा हाऊस, सिन्नर येथे करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे ए.जी अजनाळकर (चीफ जीएम, टीआरडी) एस.बी. रंगारी (मुख्य अभियंता) नाशिक परिमंडळ, ए. आर. चव्हाण (कार्यकारी अभियंता, नाशिक ग्रामीण विभाग), सोनवणे, कार्यकारी अभियंता (टीआरडी), एन.बी. रोहनकर (उपकार्यकारी अभियंता) हे उपस्थित होते.
या परिसंवादात वीज सुरक्षा, औद्योगिक सुरक्षेचे मापदंड व वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. वीज पुरवठा खंडीत झाल्यास याबाबतीत महावितरण अधिकारी व कर्मचारी उदासिन असतात असे ग्राहकांना वाटते परंतू त्यामुळे महावितरणच्या महसूलावर कसा प्रतिकूल परिणाम होतो हे आकडेवारीसहीत स्पष्ट करण्यात आले. उपस्थित वीज ग्राहकांनी, उद्योजकांनी आपल्या समस्या, प्रश्न महावितरणच्या अधिकार्यांसमोर मांडल्या.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division