‘स्कॅवा’ आता इन्फोसिसच्या ताब्यात

इन्फोसिसने एप्रिलमध्ये ‘स्कॅवा’ कंपनीचे संपादन करण्यासाठी करार केला होता. त्या करारानुसार सुमारे १२ कोटी अमेरिकी डॉलर्सला ई-कॉमर्स सेवा पुरवणार्या ‘स्कॅवा’ या कंपनीचे इन्फोसिसने अधिग्रहण केले आहे.
‘सध्या नवीन अधिग्रहणाच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडून घेणे उद्देश नसून बुद्धिमत्ता, प्रतिभा, क्षमता ह्या विभागांमध्ये काम करणार्या कंपन्यांचे अधिग्रहण हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्या उद्देशामुळेच कंपनीने कॅलैडसचे अधिग्रहण केले आहे, असेही संकेतस्थळावर सांगितले आहे’ असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी आक्रमक अधिग्रहण धोरण अवलंबले असून त्यांचा ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अशा भागात काम करणार्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यावर भर आहे. अलिकडेच इन्फोसिसने सुमारे १२५० कोटी रुपयांना ‘पनया’चे अधिग्रहण केले होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division