प्राइस वॉरमुळे बीएसएनएललाचा आर्थिक संकटाशी सामना

bsnl1आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अस्तित्वाचा लढा सुरु आहे. आर्थिक संकटामुळे या कंपनीतील १.७६ लाख कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगारच मिळालेला नाही. बीएसएनएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पगार लटकल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. बीएसएनएल कंपनीतील कर्मचाऱ्यांवर वेतनापोटी दर महिन्याला १२०० कोटी खर्च केले जातात. कंपनीच्या एकून उत्पन्नाच्या ५५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केला जातो. तसेच कंपनीच्या बजेटमध्ये दरवर्षी ८ टक्क्याने वाढ केली जाते. याचाच अर्थ पगारावर कंपनीचा दरवर्षी खर्च वाढतो, पण त्या मानाने कंपनीच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. दरम्यान, ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएलने दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना पत्र लिहून या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे..गेल्या तीन वर्षांपासून बीएसएनएल आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division