‘एचडीएफसी’ बँक देशात सर्वोत्तम स्थानी

HDFC Bank‘एचडीएफसी’ बँकेने ‘वर्ल्ड्स बेस्ट बँक’ सर्व्हेत अव्वल स्थान पटकावले आहे.
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील सर्वोत्तम बँकेच्या सूचीत अव्वल स्थान मिळविले आहे. मार्केट रिसर्च फर्म स्टॅटिस्टाच्या मदतीने फोर्ब्जकडून अहवाल तयार करण्यात आला होता. यात 23 देशांतील बँकांच्या आढाव्याचा समावेश आहे.
फोर्ब्जकडून देशातील बँकांची क्रमवारी ठरविताना त्यांची आर्थिक स्थिती, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक या गोष्टीं लक्षात न घेता केवळ ग्राहकांना देण्यात येणाऱया सेवांचा निकषही लावण्यात आला होता. ग्राहकांचा बँकेवर असणारा विश्वास, अटी, सेवा, डिजिटल आणि आर्थिक सेवा आदींचा या निकषांत समावेश करण्यात आला आहे.
ग्राहकसेवेसाठी एचडीएफसी बँकेला प्रथम क्रमांक मिळाल्याचा आम्हाला आनंद असून, हे सर्वस्वी ग्राहकांमुळेच शक्य झाले आहे. ग्राहक हेच आमचे सर्वस्व असून, त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आम्ही त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करू, असे एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक,आदित्य पुरी म्हणाले. एचडीएफसी बँकेनंतर दुसरा नंबर आयसीआयसीआय बँकेचा क्रमांक लागतो तर, तिसऱया स्थानी सिंगापूरस्थित डीबीएस बँक आहे. त्याच्या खालोखाल कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी बँक, सिंडिकेट, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, विजया बँक आणि ऍक्सिस बँक असे अनुक्रमे क्रमांक आहेत. एचडीएफसी बँकेने आधुनिक तंत्रज्ञान आणि 4.30 कोटी ग्राहकांच्या सर्वोत्तम सेवेतून देशातील बँकांमध्ये अव्वल स्थान मिळवत स्टेट बँकेलाही मागे टाकले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division