भारत इराणऐवजी सौदी अरेबियाकडून तेल खरेदी करणार

crudeभारत आता इराणऐवजी आता सौदी अरेबियासारख्या देशातून तेल खरेदी करणार आहे. अमेरिकेने भारताला इशारा दिला की, इराणकडून तेल खरेदीसाठी मिळणारी सुट रद्द केली आहे. त्यानंतर भारताने इराणकडून तेल खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले. ट्रम्प सरकारसोबत भारत सरकार चर्चा करणार एजन्सीनुसार अमेरिकेद्वारे तेल खरेदीवर मिळणार्या सुटचा कालावधी 2 मेला संपत आहे. यापूर्वीच भारत सरकार ट्रंप सरकारला याचा कालावधी वाढवून देण्यासाठी अपील करणार आहे. सूत्रांनुसार, जोपर्यंत या दोन्ही देशात या विषयावर चर्चा होणार नाही, तोपर्यंत इराणकडून तेल खरेदी केले जाणार नाही. यामुले महागाई वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आधीपासूनच कच्चा तेलाच्या किमती वाढत आहेत. जेव्हा 2 मे पासून सुट संपेल, तेव्हा तेलाच्या किमती खूप वाढतील. 2 मे पासून पेट्रोलचे भाव 80 रूपये प्रति लीटरपेक्षा जास्त होतील. त्यामुळे भारतात परत महागाई वाढण्याची शक्यता आहे.

DEASRA MUV ADVT