तेल दरवाढीमुळे भारताची वित्तीय तूट वाढणार

oil अमेरिकेने इराणच्या तेलावर बंदी घातल्याने जगभरात तेलाचे दर वाढले आहे. या दरवाढीचा मोठा परिणाम भारताच्या वित्तीय तुटीवर होणार आहे. त्याचा परिणाम रुपया व महागाईवर होणार आहे, असा इशारा ‘केअर रेटिंग्ज’या पतमान संस्थेने दिला आहे. इराण हा जगातील तिसर्याह क्रमांकाचा तेल पुरवठादार देश आहे. भारताची तेलाची 10 टक्के गरज इराणकडून भागवली जाते. भारताला तातडीने दुसरा तेल आयात करणारा देश शोधावा लागणार आहे. त्यातही हा तेल पुरवठादार किफायतशीर दरात पुरवठा करणारा असणे गरजेचे आहे.
अमेरिकेने सोमवारी जगातील आठ देशांना 2 मेपासून इराणकडून तेल आयातीस मनाई केली आहे. यानंतर भारताने इराणकडून येणारी जहाजे थांबवण्याचा निर्णय घेतला. चीन, जपान व भारत हे इराणचे जगातील सर्वात मोठे ग्राहक आहेत. तेलाच्या किंमती 10 टक्क्याने वाढल्यास भारताच्या वित्तीय तुटीत 0.40 टक्क्याने वाढ होते. रुपया तीन ते चार टक्क्याने घसरल्यास हे प्रमाण वाढू शकते. तेलाच्या वाढत्या किंमतीचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर दोन विभागांवर र होणार आहे. एक म्हणजे महसूल विभाग आणि दुसरा खर्च विभाग. जेव्हा तेलाच्या किंमती वाढतात. तेव्हा राज्यांना करांच्या रुपाने मोठा महसूल मिळतो. मात्र, केंद्र सरकारला त्याचा फार मोठा फायदा होत नाही. तेल कंपन्यांचा नफा मोठ्या प्रमाणावर वाढतो. इराणकडून तेलाची आयात बंद झाल्याने भारतातील तेलशुद्धीकरणावर त्याचा परिणाम होईल. या तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या दरवर्षाला 350 दशलक्ष डॉलर्सचा नफ्यावर परिणाम होईल.

नैसर्गिक वायूने केले निराश
एकतीस मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात नैसर्गिक वायूचेही उत्पादन निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत ७.६६ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division