चाकणमध्ये ‘मर्सिडिज’चा प्रकल्प सुरू

mercedes benz india gla production facility pune‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत ‘मर्सिडिज’ने आपल्या नवीन असेंब्ली प्रकल्पाचे उद्घाटन पुण्यातील चाकण येथे केले आहे. कंपनीच्या प्रसिद्ध जीएलए-क्लास कॉम्पॅक्ट लक्झरी एसयुव्ही गाड्यांची जुळणी या प्रकल्पात सुरू झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
भारतातच वाहनांची जुळणी सुरू केल्याने किंमती कमी करण्यात आल्या आहेत. ‘जीएलए-क्लास २०० सीडीआय स्टाइलची’ किंमत १.४४ लाखाने कमी करून ३१.३१ लाख करण्यात आली आहे. ‘जीएल-क्लास २०० सीडीआय स्पोर्ट’ची किंमत २.६५ लाखाने कमी करून ३४.२५ लाख करण्यात आली आहे. ‘ऑडी क्यू-३’ची किंमत २९.८० लाख तर ‘बीएमडब्लू एक्स१’ची किंमत ३२.१३ लाख करण्यात आली आहे.
पुण्यातील असेंब्ली प्रकल्पामुळे कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता २०,००० वाहनांवर पोचणार आहे. सीएलए-क्लास या वाहनाची जुळणी पहिल्यांदा सुरू होणार आहे. या नवीन प्रकल्पाचा उपयोग इतर वाहनांच्या जुळणीसाठी करण्यात येणार आहे. चाकण प्रकल्प एकाच वेळी कॉम्पॅक्ट कार्स, सेडान्स आणि एसयुव्ही कार्सची जुळणी करणारा पहिला असेंब्ली प्रकल्प ठरला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division