संशोधक- उद्योजक आणि वैद्यकीय उपकरणांचा अभियंता
                                                                   - डॉ. अशोक खांडकर

Dr.ashok khandkarअमेरिकेत जाऊन तिथे आपला पाय भक्कमपणे रोवून आपल्या जन्मभूमीला कृतार्थ करणाऱ्या भारताच्या सुपुत्रांपैकी एक नाव डॉ. अशोक खांडकर, प्रमुख कार्यकारी अधिकारी (सी.ई,ओ) झेनोकाॅर इन्कॉपोरेटेड, जगातील पहिल्या 'डिस्पोजेबल एचडी लॅप्रोस्कोप'चे निर्माते आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, जगातील पहिले बोन व्हाॅइड फिलर विथ कंट्रोल्ड अँड सस्टेन्ड रिलीज ऑफ थेराप्युटिक्सचे निर्माते! दोन्ही अत्यंत उपयुक्त संशोधने देणाऱ्या कंपन्या. एक बनवते अधिक सामर्थ्यवान लॅप्रोस्कोप जो एका वापरानंतर टाकून देणे अभिप्रेत असते तर दुसरी बनवते पोकळ म्हणजेच दुर्बल झालेल्या हाडातील पोकळी भरून काढणारे गरजेनुसार जन्म देणाऱ्या औषधांचा पुरवठा करणारे संजीवक.

अशोकजी मुंबईकर असले तरी त्यांची प्रत्येक सुट्टी वाईला जात असे जे त्यांच्या वडिलांचं गावं. "सतत सत्याचा शोध घेत राहा" छोट्या अशोकला हे बोधवाक्य दिले त्याच्या आजोबांनी तर्कशास्त्रीय लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी. अशोकचे पिता चंद्रशेखर खांडकर हे वाईच्या द्रविड हायस्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ सैन्यात भरती झाले आणि त्यानंतर त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी धरली. अशोकजींची आई अरूंधती खांडकर यांनी वाईच्या कन्या शाळेनंतर उच्च शिक्षण घेऊन मुंबईच्या महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापिकी तब्बल निवृत्तीपर्यंत केली. 1972 मध्ये अशोक यांनी सिनियर केम्ब्रिजची परीक्षा दिली आणि 1974 मध्ये रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1978 मध्ये त्यांनी सुविख्यात व्ही.जे.टी.आयमधून पदवी घेतल्यानंतर लगेचच त्यांनी गोदरेजमध्ये दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी अमेरिकेतील अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे पीएचडी करण्यासाठी त्यांना संपूर्ण शिष्यवृत्ती होती. अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग या विषयात अशोक यांनी 1985 साली पीएचडी मिळवली. त्यासाठी त्यांनी सॉलिड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोलाईट (वीजवाहक) मटेरियल्स मधील इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केला होता. या अभ्यासाचा पुढे त्यांच्या व्यावसायिक जीवनात अचाट अशा सिरॅमिक संशोधनासाठी खूपच उपयोग झाला. अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्येच त्यांना त्यांच्या भावी पत्नी उमा भेटल्या. त्या तिथे मार्केटिंग या विषयातील पदवीचे शिक्षण घेत होत्या. त्या दोघांनी 1985 मध्ये विवाह केला. डॉक्टरी पूर्ण केल्यावर अशोक यांची पहिली नोकरीची नेमणूक सॉल्ट लेक सिटी, उटाह येथे झाली. तिथे त्यांनी सॉलिड आॅक्साईट फ्युएल सेल्स या नावाच्या एनर्जी टेक्नॉलॉजीच्या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यावेळी त्यांनी असे दाखवून दिले की वीज निर्मितीसाठी जेव्हा कोळसा किंवा नैसर्गिक वायू यांचा उपयोग केला जातो तेव्हा या पूर्वापार पद्धतींमध्ये कार्यक्षमता फक्त 25 ते 30 टक्केच असते म्हणजेच जवळजवळ 70 ते 75 टक्के ऊर्जा फुकट जाते. त्याऐवजी फ्युएल सेल्स टेक्नॉलॉजी वापरल्यास हीच कार्यक्षमता 50 टक्के ते 60 टक्के म्हणजेच आधीचा दुप्पट वाढते. फ्युएल सेल तंत्र म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल कन्व्हर्शन प्रक्रिया म्हणजेच बॅटरीचे तंत्र असते त्यामध्ये कोणतेही 'चल' म्हणजे हलणारे भाग नसतात . अशोक यांच्या या नव्या तंत्राच्या यशामुळे त्यांना 'एशिया ब्राऊन ब्रोव्हरी' या स्वीस तसेच दोन जपानी गॅस कंपन्या ओसाका गॅस आणि टोकिओ गॅस यांच्याशी सहकार्य करार करता आला. या दोन्ही जपानी कंपन्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये मोडत होत्या. आता त्या सर्वांनी मिळून 'मॅकडरमॉट' ही जगातील सर्वात महत्वाच्या 100 कंपन्यांपैकी एक, अशी सुरू केली. पुढे ती 'रोल्स रॉईस' कंपनीने विकत घेतली. या सर्व घटनाक्रमात बद्दल बोलताना अशोकजींना फक्त यशस्वी संशोधनाचाच नव्हे तर संशोधन व्यवसायिक पातळीवर नेण्याची संधी तर मिळाली परंतु 'मॅकडरमॉट' बरोबरच्या सहकार्यातून त्यांना याच प्रक्रियेतील व्यवसायिक भागही अवगत झाला. शिवाय त्यातून त्यांना गुंतागुंतींचे व्यावसायिक उपक्रम, तेही भल्यामोठ्या कर्मचारी वर्गासह यशस्वीपणे राबवण्याचे प्रशिक्षणही मिळाले. पुढे स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी देखील त्यांना या नवीन कमवलेल्या आत्मविश्वासाचा फायदा झाला. फ्युएल सेल तंत्र कंपनी सोडून त्यांनी 'अमेडिका' ही कंपनी स्थापन केली. याद्वारे त्यांनी अस्थिशल्यसंबंधित उपकरणांमध्ये उडी घेतली.

इतक्या संपूर्ण वेगळ्या प्रांतात पुढे घेण्यामागचे संदर्भ सांगताना ते सांगतात की त्यांना जन्मतः क्लेफ्ट पॅलेट (म्हणजे टाळूमध्ये भेग) हे वैगुण्य होते. त्यावर उपाय म्हणून त्यांच्या तोंडात अनेकदा दुरुस्ती शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या होत्या. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांच्या तोंडात आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या खुब्यातील हाडाचा तुकडा वापरून तोंडातील टाळू दुरुस्त केली आणि त्यानंतर टाळतील वेदना झटकन कमी झाली. परंतु खुब्याच्या हाडातील वेदना मात्र पुढे सहा महिने राहिली. त्यामुळे त्यांचे प्लास्टिक सर्जन डॉ. डेव्हिड थॉमस यांच्यासोबत बरीच चर्चा झाली. डॉ. डेव्हिड यांनी त्यांची भेट सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. आरन हॉफमन यांच्याशी घडवली. तेव्हा अशोकना कल्पना सुचली की कदाचित हाडांचे गुणधर्म असलेले सिरामिक तेच काम करू शकेल आणि ते जर करू शकले तर त्या रुग्णाला आपल्या दुसऱ्या हाडाला दुखावण्याची गरज पडणार नाही. या त्यांच्या विचाराला डॉ. हॉफमन यांनी दुजोरा दिला आणि या प्रश्नाच्या वैद्यकीय बाजूविषयी त्यांना शिकवले. अशातर्हेाने इतर अस्थिव्यंगासाठी, गुडघा, खुबा, कणा इ.साठीही सिरॅमिकचा वापर होऊ शकतो हे लक्षात आले. विशेष म्हणजे अशा उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या क्लेफ्ट पॅलेटच्या रुग्णांपेक्षा कित्येक पटीने जास्त होती आणि त्या सर्वांचा यात उपचार शक्य होता. या वस्तुस्थितीमुळे डॉ.अशोक यांना ही उडी घ्यावीशी वाटली.

अमेडिका - ऑर्थो इम्प्लांट कंपनी
डॉ. हॉफमन यांच्या सहकार्याने अशोक यांनी अमेडिका ही कंपनी सुरू केली. आता नवे आगळेवेगळे सिलिकॉन नाइट्राइड प्लॅटफॉर्म तंत्र वापरून त्यांनी जगातील पहिली सिरॅमिक हिप आणि स्पायनल इम्प्लांट्स तयार केली. त्यांच्या मान्यतेसाठी मात्र तब्बल सात वर्षे लागली. यामध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या आणि शेवटी एफडीएचा हिरवा कंदील अशा पायर्या पार झाल्या. आता मात्र अशोक यांची ही कंपनी ही ऑर्थो इम्प्लांट बनवणारी पहिली कंपनी म्हणून मान्य झाली. या त्यांच्या अमूल्य शोधामुळे पाठीच्या दुखण्यावर उपचार होणे शक्य झाले आहे. फक्त अमेरिका आणि युरोपमध्ये 2007पासून 25000 इम्प्लांट वापरली गेली आहेत. तेथे किंमत 170 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. 'अमेडिका'ने जगात प्रथमच अशी उत्पादने बाजारात आणली परंतु अशोक यांच्या अंतरंगात दडलेल्या संशोधकाला आता काहीतरी नव्या शोधाचे वेध लागले होते. 'अमेडिका'चे सीईओ म्हणून त्यांना कितीतरी स्पाइन सर्जरी प्रत्यक्ष पाहायला मिळत, त्यातूनच त्यांना पुढच्या संशोधनाची दिशा सापडली. ऑपरेशन चालू असताना स्पाइन सर्जन्सना बहुतेकदा 30 ते 40 एक्सरेज घ्यावे लागतात. त्या दरम्यान त्यांच्या हातावर रेडिएशनचा हल्ला होत असतो. बाकी शरीर जरी खास एप्रनमुळे सुरक्षित असले तरी सर्जन हातमोज्यांशिवाय काम करतात. हातमोज्यांमुळे हातांच्या बोटांच्या हालचालींवर निर्बंध येतात आणि ऑपरेशनमध्ये अचूकता येऊ शकत नाही. तेव्हा अचूकतेला महत्त्व देताना सर्जन हाताच्या संरक्षणाला दुय्यम म्हणून दुर्लक्ष करतो. या कारणासाठी आता रेडिएशन पासून वाचण्याचे उपाय शोधणे प्राप्त होते. जेव्हा मुद्दाम ऊन घेण्यासाठी लोक उन्हात जातात तेव्हा अशा रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी युव्ही प्रोटेक्टिव्ह क्रिम लावतात. ह्या विचाराने अशोक यांनी क्ष-किरणांपासून रक्षण करणारे क्रीम शोधून काढले. हे जगातले पहिले एक्स-रे अॅटेन्युएटिंग क्रीम बाजारात मिळणाऱ्या सनस्क्रीन लोशनच्या तत्त्वावर घेतलेले होते. फक्त यामध्ये विद्युत-चुंबकीय वर्णपटातील दुसऱ्या किरणांना अडवण्याची युक्ती होती. या क्रीममध्ये विषारी धातू यांचा वापर नव्हता आणि ते सर्जनच्या हातावरील किरणोत्सर्गाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक कमी करत होते आणि हाताच्या क्षमतेवर बंधन आणीत नव्हते. या क्रीमलाही एफडीएची परवानगी मिळवण्यासाठी तीन वर्षे लागली. अशोक यांनी या उत्पादनाचे पेटंट मिळवून अमेरिकेत याचा व्यापार यशस्वीपणे सुरू केला. डॉ.अशोक यांचे म्हणणे आहे की "सर्वोत्तम उत्पादने निर्माण होतात ती आजूबाजूला वापरला जाणार्याण नित्य गरजेच्या वस्तूंच्या निरीक्षणातून, त्यातील उणिवा लक्षात घेऊन आणि त्यांचे निरसन करण्याच्या प्रयत्नांतून". याच प्रक्रियेतून ऑर्थो इम्प्लांटचा जन्म झाला. 'डोनर साईट माॅर्बिडिटी म्हणजेच ज्या ठिकाणाहून हाड किंवा पेशी काढून नव्या गरजवंत ठिकाणी लावल्या जातात त्या ठिकाणी निर्माण होणारी चिवट वेदना. ती घालवणे ही प्रत्येक रुग्णाची गरज होती. तेव्हा त्या उसन्या जिवंत हाडाऐवजी सिरॅमिकचे संयुग वापरणे संयुक्तिक ठरले. त्यांच्या मतानुसार जग जसे आहे तसेच नीट न्याहाळा आणि जसे असावे याची कल्पना करा हेच ध्येय प्राप्तीचे मूळ तत्त्व आहे.
डॉ. अशोक ए. जे. नोकोर या कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सीईओ आहेत. ही कंपनी डिस्पोजेबल हायडेफिनेशन लॅप्रोस्कोप तयार करते. रुग्णाच्या शरीराच्या आतील अवयवांचे काटछाट न करता निरीक्षण करता येण्याची सुविधा म्हणजे लॅप्रोस्कोप. निरीक्षणानंतर याच लॅप्रोस्कोपचा उपयोग करून शस्त्रक्रियाही करता येते विशेष म्हणजे त्यासाठी फक्त एक बारीक छिद्र पाडण्याची गरज असते. जेनो कोर्से डिस्पोजेबल वापरून देण्याचे लाप्रोस्कॉपी सर्व अडचणींवर इलाज करतात फेकून देणे योग्य असल्यामुळे दरवेळचे निर्जीव निर्जंतुकीकरण याचे प्रयास तर वाचतातच शिवाय ते अतिप्रगत स्मार्टफोन तंत्राचा वापर करीत असल्यामुळे त्यातील छोटासा हाइड्रो फिनिश हाय-डेफिनेशन कॅमेरा रेकॉर्ड यामुळे तो अत्यंत छोट्या खिशात मावणाऱ्या आकारात बनतो. अमेरिकेसारख्या प्रगत देशांना पुन्हापुन्हा वापरण्याच्या सौसाधनांमधून होणारा होऊ शकणारा जंतुसंसर्ग परवडत नाही कारण, सामाजिक आरोग्य व्यवस्था अतिशय महाग असते शिवाय आरोग्याच्या बाबतीत नुकसान भरपाई होऊ शकणारे खटले वगैरे बाबी फारच आवाक्याबाहेर जातात. शिवाय वेळ फुकट जातो तो वेगळाच म्हणून डॉक्टरांचे काम आणि संपूर्ण हॉस्पिटलसाठीही झेनोस्कोप्समधील गुंतवणूक ही बचतच असते. अप्रगत देशांसाठीही बचत हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो शिवाय तेथे बनू शकणाऱ्या स्मार्टफोन उत्पादकतेला उत्थान मिळून किमतीत घट होऊ शकते.

आजवरचा डॉ.खांडकरांचा सत्तावीस वर्षांचा प्रगत तंत्रज्ञान कंपन्याच्या कारभाराचा अनुभव म्हणजे व्यवसायाचा विकास, अर्थकारण, धोरणात्मक नियोजन इ. त्यांना खूप काही शिकवून गेला. आज ते तब्बल पस्तीस अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसचे मालक आहेत. तसेच यूटा विद्यापीठाचे मानद प्राध्यापकही आहेत. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने त्यांनी बाजारात आणलेल्या सिरॅमिक तंत्रज्ञानाबद्दल त्यांना टिब्बेटस पुरस्कारही देण्यात आला.२०१० मध्ये त्यांना यूटा गव्हर्नरकडून मानचिन्ह देण्यात आले आहे. डॉ. अशोक यांच्या मते भारताने तंत्रज्ञान,अर्थव्यवहार आणि माहिती महाजाल या विषयांमध्ये मोठी झेप घेतलेली आहे. आता खरी गरज आहे शिक्षणाचा आवाका रुंदावण्याची आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधांची.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division