भारतीय अर्थव्यवस्थेवर संरचनात्मक संकट

arthavyavasthaभारतीय अर्थव्यवस्थेवर संरचनात्मक संकटाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा गंभीर इशारा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथीन रॉय यांनी दिला आहे.
भारत ‘मध्यम-उत्पन्न’ सापळ्यात अडकण्याची शक्यता असून, तसे झाल्यास भारताची स्थिती ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांसारखी होईल, असेही रॉय यांनी निदर्शनास आणून दिले.

रॉय यांनी सांगितले की, जगाच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे आढळून आले आहे की, मध्यम-उत्पन्न सापळा टाळता येऊ शकतो. परंतु, एकदा त्यात फसले की मग बाहेर पडता येत नाही.

एका संस्थेने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतातील ग्राहकी घटल्याचे मागील अनेक तिमाहींपासून दिसून येत आहे. वाहन, एफएमसीजी आणि हवाई वाहतूक यासारख्या अनेक क्षेत्रांना याचा फटका बसला. अर्थपुरवठ्यात घसरण, अनिश्चिततेत वाढ व ग्रामीण व शहरी या विभागांतील उत्पन्नातील घसरण यामुळे लोकांच्या खर्चात कपात झाली आहे. रॉय यांनी म्हटले की, भारताच्या वृद्धीला निर्यातीचा कोणताही आधार नाही. भारतातील १० कोटी ग्राहकच वृद्धीला ऊर्जा देत आले आहेत. त्यांच्या खरेदीच्या बळावरच भारताची वृद्धी अवलंबून आहे. या वर्गाच्या उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे मागणीत घट होताना दिसत असून, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division