’डी अँड बी’ची मानांकने जाहीर

timthumbटीसीएस ठरली सर्वोत्कृष्ट कंपनी, रिलायन्स दुसर्‍या तर आयटीसी तिसर्या क्रमांकावर डन अँड ब्रॉडस्ट्रीट (डी अँड बी) ने विविध आर्थिक आणि कार्यान्वय मानकांच्या आधारे आयटी क्षेत्रातील टीसीएसची क्रमांक एकची कंपनी म्हणून निवड केली आहे. व्यावसायिक माहिती देणारी कंपनी डन अँड ब्रॉडस्ट्रीटने भारतातील ५०० कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर गेल्या १२ ते १८ महिन्यांत विश्वास वाढला असल्याचे कंपनीतर्फे यादी जाहीर करताना सांगण्यात आले.
‘डी अँड बी’च्या मते, या ५०० कंपन्यांची टॉप लाइन ग्रोथ (विक्री आणि उत्पन्न) आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ८.७ टक्के कमी झाली आहे. दबाव आणि मागणी नसल्यामुळे ही घट झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या कंपन्यांचा कर भरल्यानंतर नफा ८.६ टक्के कमी झाला आहे.

सर्वोत्कृष्ट १० कंपन्या
या यादीत रिलायन्स दुसऱ्या तर आयटीसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त ओएसजीसी चौथ्या, कोल इंडिया पाचव्या, इन्फोसिस सहाव्या, एचडीएफसी बँक सातव्या, एचडीएफसी आठव्या, हिंदुस्तान युनिलिव्हर नवव्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया दहाव्या स्थानावर आहे. या नव्या यादीत ५१ नव्या कंपन्यांचा समावेश झाला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division