मुंबईत भारतीय कौशल्य संस्था उभारणार

skill development minister pandayभारतात जागतीक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मुंबईत भारतीय कौशल्य संस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी केली. पांड्ये म्हणाले, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबवला जाणार असून भारतीय कौशल्य संस्थेचे बांधकाम टाटा एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट करणार आहे. यासाठी टाटासमूह सुमारे ३०० कोटी पये गुंतवणार असून सरकार या प्रकल्पासाठी सुमारे एकर जमीन देणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या संस्थेची पायाभरणी होईल अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली. १० हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची या संस्थेची क्षमता असेल. पारंपरिक क्षेत्राबरोबरच सुरक्षा, अंतराळ, पोलाद आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातही ही संस्था कौशल्य प्रशिक्षण पुरवणार आहे. मुंबईतल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठीही पावले उचलण्यात आल्याचे यावेळी नमूद केले गेले. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिल्यानंतर पांड्ये यांनी तिथल्या प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला..

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division