सोलापूरमध्ये भरणार वस्त्रोद्योग प्रदर्शन

exibitionसोलापूर येथे २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत 'व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्स्पो अँड समिट २०१९'चे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पाठिंब्याने होत असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील उद्योजकांना व संबंधित घटकांना एकत्र आणले जाणार आहे. कापूस उत्पादकांपासून कापड उत्पादक ते व्यापारी आणि निर्यातदार, आयातदार आदी सर्व घटक या व्यासपीठावर एकत्र येतील. या सर्वांना टेरी टॉवेल उत्पादनामधील अनोख्या अशा विपणन आणि निर्यात संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासह उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये दुवा साधण्याचे कामही या प्रदर्शनातून होणार आहे. सोलापूर येथील कर्मवीर आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात हे प्रदर्शन भरणार आहे.
'टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन'ने 'ग्लोबल नेटवर्क'च्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन केले असून त्याला राज्य सरकारच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनामध्ये जागतिक खरेदीदारांना महाराष्ट्रातील निवडक अशा वितरकांना भेटण्याची संधी मिळू शकेल. सोलापूर हे टेरी टॉवेल आणि चादर उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ही उत्पादने स्वामित्व हक्कांतर्गत नोंदणीकृत झालेली आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division