पोलादाच्या किमतीत लक्षणीय घट

सपाट आणि लांब आकाराच्या पोलाद उत्पादनावर सर्वाधिक आयात शुल्क लागू करण्यात आल्यामुळे देशातील पोलादाच्या किमतीवरील ताण कमी होणार आहे. चीनसारख्या देशाकडून स्वस्त आयात होत असल्याने पोलादाच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा ‘मुडीज’ या पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे.
देशात स्वस्त आयातीचे प्रमाण जवळपास ७० टक्के असून त्यातही एकतृतीयांश आयात चीनकडून होत आहे. त्यामुळे गेल्या १२ महिन्यांमध्ये पोलादाच्या किमतीत जवळपास २७ टक्क्यांनी घट झाली आहे. केंद्र सरकारने पोलादावरील सीमाशुल्कामध्ये २.५ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे देशातील उत्पादकांना गेल्या आठवड्यात मोठा दिलासा मिळाला. कार्बन स्टील उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील या दोन कंपन्यांना मुडीजने सकारात्मक पतदर्जा दिला आहे. स्वस्त आयातीमुळे टाटा स्टीलच्या पोलाद किमतीत प्रतिटन सहा टक्क्यांनी घट झाली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division