आर्थिक मंदीची आयएमएफ’कडूनही पुष्टी

Arthik mandiविकास दर अंदाज खालावून ६.१ टक्क्य़ांवर
भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याचे स्पष्टपणे सूचित करीत, जागतिक बँकेपाठोपाठ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)नेही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराचा अंदाज खुंटविला आहे.
‘आयएमएफ’ने अर्थवृद्धी दर चालू वर्षांसाठी ६.१ टक्क्यांवर आणून ठेवताना पुढील वर्षांत तो ७ टक्के अंदाजला आहे. यापूर्वीचा या संस्थेचा अंदाज ६.४ टक्के होता. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने तो ०.३ टक्क्यांनी खाली खेचण्यात आला आहे.
आयएमएफने एप्रिलमध्ये भारताच्या विकास दराबाबत ७.३ टक्के पूर्वअंदाज व्यक्त केला होता. आता मात्र तो थेट १.२ टक्क्यांनी सुधारून, कमी केला गेला आहे.
जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक विकासाचा वेग ६ टक्के असेल, असे स्पष्ट केले. जागतिक बँकेचा विकसनशील देशाच्या प्रगतीचा यापूर्वीचा अंदाज ६.९ टक्के होता.
भारताचा २०२० मधील विकास दर ७ टक्के असेल, असे आयएमएफने म्हटले असले तरी तो आधीच्या अंदाजापेक्षा ०.५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.
भारताबाबत वाहन, स्थावर मालमत्तासारख्या क्षेत्रांच्या कमकुवत कामगिरीमुळे दुसऱ्या तिमाहीत विकासाचा वेग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे आयएमएफचे म्हणणे आहे. ताज्या व बहुचर्चित बँकेतर वित्तीय कंपन्यांतील अस्थिरतेचाही उल्लेख यात केला गेला आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्तीला सरकारच्या योजना चालना देऊ शकतील, असे नमूद करतानाच जागतिक बँकेने कंपनी करातील कपात, व्याजदर कपात आदींमुळे अर्थव्यवस्था पुढील वर्षांत वाढ नोंदवू शकेल, असे म्हटले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division