रोकडरहित व्यवहारांतसावधगिरी आवश्यक

cash safeनोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली रोख रकमेची देवाण-घेवाण होत नसल्यामुळे हे व्यवहार अतिशय सुलभ होतात. तसेच, कायमस्वरूपी नोंद होत असल्याने संबंधित व्यवहाराचा पुरावाही ठेवता येतो. मात्र हे व्यवहार अतिशय सावधगिरीने करणे गरजेचे असते. डिजिटल किंवा रोकडरहित व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी तसेच, सायबर गुन्हेगारांकडून कोणते सापळे रचले जातात, त्यापासून आपले संरक्षण कसे करावे हे पाहू या.

अनेक सायबर गुन्हे बनावट मोबाइल अॅपच्या साह्याने केले जातात असे उघड झाले आहे. यासाठी हे सायबर गुन्हेगार बनावट एनजीओच्या माध्यमातून बनावट क्रमांक प्रसिद्ध करतात रोकडरहित आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तींची व संस्थांची मदत घेणे योग्य नाही; तसेच त्यासाठी कोणतेही अॅप डाउनलोड करू नये. त्याशिवाय आयुर्विमा अथवा आरोग्यविमा पॉलिसी विकत घ्यायची असल्यास ओळखीचा एजंट अथवा संबंधित कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरूनच व्यवहार करावा. प्राप्तिकर विवरणाची प्रक्रिया आता ऑनलाइन झाल्यामुळे कर परतावाही करदात्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेतात. तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कर परतावा मिळणार आहे असे सांगून फसवेगिरी केली जाते.

केवायसीसाठी प्रत्येक बँकेची ठरावीक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेव्यतिरिक्त कोणालाही आधार, पॅन आदी तपशील देऊ नये, अशी सूचना बँकांकडून वारंवार केली जाते. मात्र अनेक ग्राहक बनावट केवायसीला बळी पडतात. केवायसी अद्ययावत करण्यासाठी ई-मेलद्वारे एक लिंक पाठवली जाते. त्यावरून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. यासाठी संबंधित बँकेत जाऊन अथवा बँकेच्या अधिकृत पोर्टलवरच ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सायबर गुन्ह्यांमध्ये पासवर्ड डीकोड करून आर्थिक घोटाळा करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगभरातील अडीच कोटी बँक ग्राहकांचे पासवर्ड अतिशय सोपे व असुरक्षित असल्याचे उघड झाले. या खातेदारांनी 123456 असा पासवर्ड ठेवला होता! बँक खात्याचे पासवर्ड किचकट किंवा अतर्क्य असावेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division