सलग सातव्या महिन्यात महागाईत घट

घाऊक महागाई निर्देशांकात (डब्ल्यूपीआय) मे महिन्यात पुन्हा घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांक अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आल्याने, घाऊक महागाई निर्देशांक पुन्हा शून्याखाली येत मेमध्ये -२.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक -२.६५ टक्के होता. त्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. प्रामुख्याने तेल आणि उत्पादन मालाच्या भावात घट झाल्याने सलग सातव्या महागाईत घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांक गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१४ पासून नकारात्मक शून्याच्या खाली आहे. त्याआधी मे महिन्यात ६.१८ टक्के होता.
डब्ल्यूपीआय एप्रिलमध्ये (-)२.६५ टक्के, मार्चमध्ये (-)२.३३ टक्के, फेब्रुवारी (-)२.१७ टक्के, जानेवारी (-)०.९५ टक्के, डिसेंबरमध्ये (-)०.५० टक्के आणि नोव्हेंबरमध्ये (-)०.१७ टक्के होता. अन्नधान्याच्या किंमती निर्देशांत मात्र वाढ झाली आहे. डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने तो ३.८% वधारला आहे. तेलाच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. उर्जा समूहाचा महागाई दर -१३.०३ टक्क्यांवरून -१०.५१ टक्के झाला आहे.
मार्चमध्ये भारताच्या निर्यातीत २१ टक्के झाली होती. गेल्या सहा वर्षांतील निर्यातीत झालेली सर्वात मोठी घट आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division