'डिजीटल तंत्रज्ञान' कार्यशाळेस उत्स्पुर्त प्रतिसाद

digital schoolचेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चर(सीएमआयए) च्या मॅजिक अंतर्गंत महिलाउद्योजकांसाठी "इनोव्हेशन प्रमोशन सेल फॉर वीमेन आंतरप्रीनर्स' जीआयझेड च्यामदतीने सुरु करण्यात आला आहे. या सेल च्या माध्यमातुन सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकमहिलांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. स्टार्टअपच्या माध्यमातुन पुढे येणाऱ्या संकल्पनांना बळ देऊन त्यांना प्रत्यक्षात औद्योगिक रुप देण्यासाठीचे साधन म्हणुन मॅजिक कार्यरत आहे.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रीकल्चर (सीएमआए) च्या मराठवाडा ऍक्सि लरेटर फॉर ग्रोथ ऍण्ड इन्क्युठबेशन काऊंसिल (मॅजिक) आणि जीआयझेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल मार्केटींग' या विषयावर सोमवार दि.३० डिसेंबर रोजी देवगीरी इंजिनीरिंग ऍण्ड मॅनेजमेंट इंस्टीट्युट, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आजोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेदरम्यान डिजीटल मार्केटींग क्षेत्रातील तज्ञ, नितिन ज-र्हाड, डिजीटल मार्केटींग प्रमुख, ई-कट्टा इनोव्हेटर्स एल.एल.पी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रमुख्याने खालील विषयावर मार्गदर्शन केले व संवाद साधला,

'फेसबुक अकाऊंट आणि सोशल पेज' कसे तयार करावे
'यु-ट्युब जाहिरात कशी तयार करवी व त्याद्वारे उत्पन्न कसे मिळवावे
'ट्ट्विटर' अकाऊंट कसे तयार करावे व त्याचा उपयोग कसा करावा
इंस्टाग्राम वर जाहिरात कशी तयार करावी हे काही यशस्वी सोशल मिडीयाकॅंपेनिंग ची उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
त्यांनी सोशल मिडीया च्या वापराविषयी नियम व धोरणे यांविषयी देखील माहिती दिली.

ही कार्यशाळा सहभागींसाठी अतिशय माहितीपुर्ण,उपायुक्त व संवादात्मक होती.याद्वारे त्यांना उत्पादनांच्या जाहीरातीसंबंधी व आपल्या उत्पादनांना बाजारपेठेतयोग्य स्थान मिळण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करावा हेप्रात्यक्षिकाद्वारे अत्मसात करण्याची संधी मिळाली.

डॉ.उल्हास शिऊरकर, संचालक, देवगीरी इंस्टीट्युट ऑफ इंजिनिरिंग ॲंडमॅनेजमेंट स्टडीज, औरंगाबाद यांनी ह्या कार्यशाळेसाठी कॉप्युटर लॅब उपलब्धकरून दिली व सहकार्य केले तसेच प्रोफ़ेसर श्री एस.बी.कल्याणकर, हेड ऑफ दडिपार्टमेंट,कॉप्युटर सायन्स ॲंड इंजिनिरिंग यांनी सहभागींना या प्रसंगीमार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत सुक्ष्म-लघु व मध्यम उद्योजक, नव उद्योजक, नवे उपक्रम प्रस्थापितकरणारे तसेच महिला उद्योजक अश्या ४० पेक्षा अधिक जणांनी उत्स्पुर्त सहभागघेतला व प्रात्यक्षिकांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा अद्ययावत महिती प्राप्त केली.
सी.एम.आय.ए.चे इन्क्युबेशन मॅनेजर श्री महेश कट्टले व सुर्याकांता शिरसागरयांनी ह्या कार्यशाळेचे संपन्न करण्यात परिश्रम घेतले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division