महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी शंतनु भडकमकर

maccia 1महाराष्ट्र चेंबरच्या ८७च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी शंतनु भडकमकर व वरिष्ठ उपाध्यक्षपदी संतोष मंडलेचा यांची निवड करण्यात आली. या पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
वॉल्ट डिस्नेच्या ’स्वप्न पाहाल तरच ती पूरी कराल’ या उक्तीला उद्घोषित करून राज्याच्या विकासासाठी चेंबरचे कार्य पुढे नेत या भव्य परंपरा असलेल्या संस्थेचे नेतृत्व करण्याचे स्वप्न साकारले असले तरी वर्षभरात समाजाभिमुख उपक्रम करून भरीव योmaccia 2गदान देता येईल तेव्हाच हे स्वप्न पूर्ण होईल असा विचार भडकमकर यांनी यावेळेस मांडला.
चेंबरचे मावळते अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेताना सहकारी उपाध्यक्ष, सचिवालय सदस्यांचा तसेच विविध समिती अध्यक्षांच्या योगदानाचा गौरव केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशाच्या सागरी मालवाहतूक क्षेत्रातील केंद्रबिंदू असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व युरोपच्या नामांकीत पोर्ट ऑपरेटर्समधील पील समूह यांच्यात एक समन्वय करार करण्यात आला. दोन देशातील सागरी दळणवळणाबाबतीत होणारा पहिलाच समन्वय करार आहे.
macciaआपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,'येत्या ५ वर्षात चीनपेक्षाही भारताचा आर्थिक विकासाचा दर वाढणार आहे. देशाच्या विविध बंदरांना जोडण्याचे तसेच बंदरे व विमानतळ, रेल्वे आणि महामार्गाद्वारे वेअरहाऊसेस यांना जोडण्यासाठी दळणवळण अद्ययावत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मेक इन इंडियाअंतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देताना त्यांना कच्चा माल सुस्थितीत व शीघ्रगतीने पुरविण्यासाठी रेल्वे व्यवस्था अद्ययावत करत विविध योजना सुरू केल्या आहेत याची आकडेवारी व माहिती त्यांनी यावेळेस सादर केली.
चेंबरचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division