महाराष्ट्राची आर्थिक पाहणी

railwayमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत.

Railway 01

रेल्वे
भारतात रेल्वे ही अतिशय परिणामकारक अशी मोठ्या प्रमाणावरील वाहतूक व्यवस्था आहे. प्रवासी व मालवाहतूक ही रेल्वेची दोन प्रमुख अंगे आहेत. ३१ मार्च, २०१४ रोजी राज्यातील लोहमार्गाची एकूण लांबी ६,१०३ किमी (३७८ किमी कोकण रेल्वेसह) होती. ती भारतातील एकूण ६५,८०८ किमी लांबीच्या ९.३ टक्के एवढी होती. राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची स्थिती पुढील तक्त्यात दिली आहे.

Railway 02मुंबई उपनगर रेल्वे
उपनगरीय रेल्वे हे मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रमुख साधन आहे. मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा पश्चिम रेल्वे (३६ स्थानके) आणि मध्य रेल्वे (६२ स्थानके) यांद्वारे चालविली जाते. हार्बर मार्ग (३८ स्थानके) हा मध्य रेल्वेचा भाग आहे. दर दिवशी एकूण २०५ गाड्या २,८१३ फेर्‍यांद्वारे ८० लाख प्रवाशांची ने-आण करतात. उपनगरी रेल्वे गाड्यांची वर्षनिहाय संख्या पुढील तक्त्यात दिली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ (मुंरेविम), एमयुटीपी II मधील रेल्वे मार्गाची कामे करीत आहे. एमयुटीपी II मधील प्रगतीपथावरील प्रकल्पांची सद्यःस्थिती पुढील तक्त्यामध्ये दिली आहे.

Railway 03नवी मुंबई मेट्रो रेल प्रकल्प
पाच मेट्रोरेल मार्गिकांचा तीन टप्प्यात विकास करण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यातील सीबीडी बेलापूर- पेंधर- कळंबोली- खांदेश्वर- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) मार्गिकेचे काम तीन टप्प्यात अंमलात येईल. यापैकी, पहिल्या टप्प्याचे सीबीडी बेलापूर- पेंधर (११.१ किमी) चे काम प्रगतीपथावर असून, प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. २,९९७ कोटी आहे. डिसेंबर, २०१४ पर्यंत त्यावर रु. ४९७.३ कोटी खर्च झाला आहे. सीबीडी बेलापूर – पेंधर (पहिला टप्पा) २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division