रिटेल लीडरशीप परिषद
भारतातील रिटेलर्सचा एकत्रित आवाज असलेल्या रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय रिटेल लीडरशीप परिषदेचे आयोजन करण्यात आले. “कनेक्टेड रिटेल: द न्यू वर्ल्ड ऑर्डर” ही थीम असलेल्या या परिषदेला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी, फ्लिप कार्टचे सचिन बन्सल, गुगल फॉर वर्कचे मोहित पांडे, ट्रस्ट फॉर रिटेलर्स ऍंड रिटेल असोसिएट्सचे संस्थापक बी एस नागेश, प्रसिद्ध इक्विटी इनव्हेस्टर राकेश झुनझुनवाला, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले,"झपाट्याने वाढणाऱ्या किरकोळ विक्री उद्योगामध्ये महराष्ट्राचा वाटा १२% इतका असून यातही मुंबई हे देशातील सर्वात अधिक व्यवहार करणारे शहर आहे. सर्वसामान्यपणे मिळकतीचा ३०% हिस्सा किरकोळ खरेदीसाठी वापरला जातो. तसेच या क्षेत्रावर ४ कोटी लोकसंख्येचा उदरनिर्वाह होत आहे. ह्या बाबी लक्षात घेऊन शासनाने किरकोळ उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण आखण्याची तयारी केली आहे.' आपल्या भाषणात त्यांनी कारागिरांसाठी विविध स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम, नाशिवंत उत्पादनांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी खास योजना, लहान व्यावसायिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले "मैत्री' व्यासपीठ यासंबंधी उपस्थितांना माहिती दिली.
परिषदेबद्दल बोलताना श्री कुमार राजगोपालन सीइओ, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणाले, “रिटेल उद्योग जलद गतीने बदलत आहे. ग्राहकांना घरबसल्या विविध प्रकारची माहिती मिळत आहे, यासाठी मोबाईल फोन, टीव्ही आणि सोशल मीडियाचे आभार मानायला हवेत. रिटेल लीडरशीप परिषद सर्वोत्तम रिटेलर्सना व ईरिटेलर्सना एकाच मंचावर आणते आणि प्रत्येकाला त्यांच्या धोरणांबद्दल पुन्हा विचार करण्यासाठी प्रोत्साहन देते. या परिषदेच्या निमित्ताने धोरण कर्ते उद्योगाला अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून एकत्रित झाले आहेत.”
गुगल फॉर वर्क क्लाऊडवर आधारातील व्यवसाय साधने उपलब्ध करुन देतात जी अतिशय सोपी आणि विश्वासार्ह असतात. ही साधने संस्थांना नूतनीकरणामध्ये, अधिक सक्षमतेने कार्य करण्यात. मोहित पांडे, कंट्री हेड, गुगल फॉर वर्क म्हणाले,” सर्वोत्तम ग्राहक तंत्र उद्योगजगात आणून अनेक संस्था एका पातळीवर बाजारपेठेमध्ये सहभागी होऊ शकल्या आहेत, नाविन्य आणू शकल्या आहेत. ग्राहक आता वाढत्या प्रमाणात ऑनलाइन प्रकाराकडे वळले आहेत त्यामुळे रिटेलर्सनीदेखील डिजीटल रुपांतरणाला अंगिकारणे आवश्यक आहे.”
“कनेक्टेड रिटेल: द न्यू वर्ल्ड ऑर्डर. आर वुई रेडी?” या प्रोत्साहनपर पॅनल चर्चेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . यामध्ये पॅनलने रिटेल संस्थांच्या खरेदीकर्त्यांना डिजीटल ते भौतिक जगापर्यंतचा प्रवास सुलभतेने उपलब्ध करुन देण्याची, त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाईल रिटेल अनुभवाला त्यांच्या इनस्टोअर अनुभवाशी जोडण्याची तयारी याबद्दल चर्चा केली.
गुंतवणूकदारांच्या अपेक्षा व्यक्त करताना राकेश झुनझुनवाला म्हणाले की,” आधीपासून अस्तित्वात असलेला कॅश फ्लो आणि/किंवा भविष्यातील कॅश फ्लोची अपेक्षा हा इक्विटी व्हॅल्युएशनचा आधार आहे.
या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे फ्लिपकार्टच्या सचिन बन्सलनी घेतलेले परिणामकारक सत्र होय, कारण देशाची रिटेल रुपरेषा संपूर्णत: बदलणाऱ्या कंपनीच्या विषयांबद्दल त्यांनी माहिती दिली. यात रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे खालील सात विशेष अहवालांचे जगातील प्रख्यात सल्लागार आणि बाजारपेठ संशोधन संस्थांच्या सहयोगाने विमोचन केले.
RAI – JLL: भारतातील रिटेल आणि ऑफिस रिटेल इस्टेटचे रुपांतरण
RAI – AT Kearney: भविष्यातील भारत: कनेक्टेड ग्राहकांचा उदय
RAI – Deloitte: समज आणि अनुभूति
RAI – Knight Frank: थिंक इंडिया: थिंक रिटेल २०१६
RAI – PwC: भारतीय रिटेल ऑपरेटिंग मॉडेलचे निर्माण
RAI – BCG: डिजीटल @रिटेल उलगडा: ओम्नी चॅनल ग्राहकांना जिंकणे
RAI – GPTW: काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम रिटेल कंपन्या
फ्रॉम फार्म टू फोर्क- द फ्युचर फोकस या सत्रात ग्रोमॅक्सचे सहसंचालक के. राधाकृष्णन यांनी पॅनल सदस्य विजय राजगोपालन, राष्ट्रीय विक्री अध्यक्ष- ऍफिलिएट पार्टनरशीप्स झेटा, दामोदर मॉल, सीइओ ग्रोसरी रिटेल, रिलायन्स रिटेल; हरि मेनन, सहसंस्थापक आणि सीइओ बीगबास्केट.कॉम, रियाझ अमलानी, सीइओ, इंप्रेसारियो फुड्स, सदाशिव नायक सीइओ, बिग बाझार आणि सागर जगदिश दर्याणी, संस्थापक वाव! मोमो यांनी फुड रिटेल क्षेत्रावर ग्राहकांच्या अन्नपदार्थांच्या बदलत्या गरजा कसा प्रभाव पाडत आहेत यावर प्रकाश टाकला.
परिषदच्या पहिल्या दिवसाची अखेर आरएआयच्या आणि ग्रेट प्लेस टू वर्क संस्थेच्या पुरस्कार सोहळ्याने झाली, ज्यामध्ये भारतातील १० सर्वोत्तम रिटेल कंपन्यांना सम्नानित करण्यात आले.
दुस-या दिवशी “ग्राहकांशी जुळण्याची कला आणि शास्त्र”, “ब्रॅंड मार्केटिग: सर्वांना आवडेल अशा ब्रॅंडच्या निर्मितीचे आव्हान”, “आकर्षित करणे आणि फरक दाखवण्यामार्फत शक्तीशाली ब्रॅंड्सची निर्मिती, “फ्युचर फुटप्रिंट- प्रेक्षकांच्या संकल्पनांचे सत्र” असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.